()
असणे तिचे मनाचा आधार होत गेले
आले जरी दुरावे ते पार होत गेले
बघता तिच्याकडे ती नजरेस थेट भिडली
हातून ढाल पडली अन वार होत गेले
मी वाट पाहिली पण नजरेस ती पडेना
आवाज पाखरांचे चित्कार होत गेले
जवळीक साधण्याचा जेव्हा प्रयत्न झाला
रोमांच उभयतांचे तलवार होत गेले
बेभान होत गेलो प्रेमामधे परंतु
आयुष्य त्याच वेळी साकार होत गेले
गझलेमधे तिचा मी उल्लेख काय केला
झाले पुढे पुढे ते अलवार होत गेले