()
तुझी सावली न दिसे,
मला कधी आता आई।
तुझ्या मायेचा तो स्पर्श,
मी ग रोज वाट पाही।
कुठे गेली ग सोडुनी,
दुःख माझे तू घेऊनी।
तुझ्याविणे जीवनाला,
अर्थ उरलाचं नाही।
तुझ्या अश्रूंचे ते पाणी,
मला पुसायचे होते।
तुझ्या डोळ्यात ग मला,
सुख बघायचे होते।
सतावते आठवण,
येते याद तुझी आई।
लपवले ग तरीही,
अश्रू थांबतचं नाही।
नाही भीती ग अंतरी,
कुठल्याही संकटाची।
मी ग आहे सामोरीला,
आई उभी तू पाठीशी।
नाही चिंतन ग मनी,
नाही भीती माझ्या दारी।
जरी जीवन सोनेरी,
आईविना ग भिकारी।।