कुठून आला हा कोरोना
कुठून आला हा कोरोना
मुश्किल कर दिया जीना
गरीबाच्या हाताला काम मिळेना
दोन वेळची चुलही पेटेना
कशी केलीस रे दैना
कशी केलीस रे दैना
बालकाचे बालपण हरवले
नाही शाळा नाही खेळणे
नुसतेच कोंडून रहाणे
नुसतेच कोंडून राहणे
युवकाचे तर भविष्य झाकोळले
काय शिकावे काय करावे
काही कळेना
काही कळेना
पैसे वाल्यायासाठी
नाही शॉपिंग नाही लाँग ड्रायव्हींग
नाही सामाजीक कार्यक्रम
नाही सामाजीक जीवन
नाही पर्यटन नाही देवदर्शन
नुसताच एकलेपण
नुसताच एकलेपण
नाही होत कुणाच्या गाठी
पोटच्या मुलांसोबत झाली नाही वर्षभर भेटी
किती वाईट आहे हे एका आईबापासाठी
काय केलेस कोराना
काय केलेस कोरोना
ज्याचा रिपोर्ट पॉाझिटीव्ह, त्याला चांगली वागणूक मिळेना
त्याला एमबुलन्स मिळेना
त्याला बेड मिळेना
त्याला ऑक्सिजनही मिळेना
कशी केलीस रे दैना
कशी केलीस रे दैना
भविष्याच्या काळजीने अन्नपाणी ही गोड लागेना
आता तरी सुखाने जगु देना
आता तरी सुखाने जगु देना
एक वर्ष झाले खूप पीड ले साऱ्या जगाला
एक मेकांशी भेटू दे आता आम्हाला
आता तरी जा कोरोना
आता तरी जा कोरोना
नको करूस अजून दैना
हीच करूया बाप्पा चरणी प्रार्थना
गो कोरोना गो कोरोना