*देवदासी*
हिरवा शालू,पायी घुंगरू
भरजरी तो साज श्रुंगार
बोहल्यावर उभी वधु ती
मनी प्रश्ने हजार
ना स्वप्नातला राजकुमार
ना वर नावाचे ध्यान
अंतपाठापलीकडे उभा
तो रुढी परंपरेचा काळ
देव आज्ञा झाली म्हणुनी
आज होतसे हे दान
अवचीत आले घडवुनी सारे
केले कोवळ्या मनाचे रानं
देवदासी म्हणुनी हिणवीत तीज
पाषाणी जगाचे हे दलाल
पंडीत पुजार्यांनी घेतला
तीज वाटुनी प्रसादासमान
मागीत जोगवा चालु लागली
ती काट्याकुट्यांची वाट
बुरसटलेल्या विचारांची
भिनली सत्ता नखशिखांत
सुन्न जाहल्या शरीराची
रोजचं होतसे शिकार
असुरी वृत्तीच्या जगी जन्मला
निष्पाप कोवळा प्राण
अनोळखी पींड तो
ना गोत्र ना बाप
पुन्हा टपुनी बसती
भक्षक हे सारे
पुन्हा तीच चालीरितींची चाल
कोवळ्या जीवाचा देव आज्ञा म्हणूनी
पुन्हा होई नरसंहार
कधी थांबावे हे भयान दान
अंधश्रद्धेचे तांडव जालं
देवदासीची हाक ऐकण्या
एक हवा परशुराम
एक हवा परशुराम……….
रोशनी रविराज हुंद्रे
बेळगांव✒️…