()
मितभाषी तू, सार्थ मोहिनी
प्रेमळ निर्मळ कांक्षीनी,
स्वभावांचा अथांग सागर
कधी सरिता तर कधी सौदामिनी…
मनकवडी तू, शांत सुशांत
भारदस्त तू सुलक्षणी,
अगाध कर्माचा पसारा
ज्ञान सुज्ञान प्रदायनी…
कर्मा वरी तुझा भरवसा
तू सुप्तगुणी कार्यकारिणी,
मातृत्वाचे दान तुला
प्रत्येकास तू गुरुस्थानी…
सुशील शामल काया तुझी
तेजोनयन विलक्षणी,
नाविण्याचा गाडा हाके
जन्मदात्री तू जगद्गजननी…