()
सप्तसुरांचे फुलले मोती त्यातून काढून घे ज्योति,
त्यातून निघतील वाटा तू सुखी होशील बाळा,
जगावेगळे काय आहे तू अन् मी जग एकच आहे,
तुझ्या पाठीशी मी आहे जशी आई लेकराला दूध पाजाय,
जन्मोजन्मीची आपली साथसंगत मग का होशील तू विसंगत,
भरभरून देईन तुला पण आता नको घाबरु विषाच्या प्याल्याला,
अंधकरातूनही निघतील वाटा होतील सर हे डोंगर,
नको होऊ घाबरा जीव कासाविस का करिसी,
जिथे स्वामी भक्ति तिथे सत्याची प्रचिती,
रंग फुलतील तुझ्या जीवनी अंबरी सजतील तारे,
आज नाहीतर उद्या वंदन करिल तुला हे जग सारे.